डॉ. आंबडेकरांच्या स्मारकासाठी नगपरिषद आग्रही

राजगुरूनगरचे नगराध्यक्ष मांदळे यांची माहिती

राजगुरूनगर – येथील पुणे-नाशिक महामार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेत डॉ. आंबडेकर यांचे स्मारक करण्यासाठी नगरपरिषद आग्रही आहे. डॉ. आंबेडकर विचारसंवर्धन समितीने संमतीपत्र दिल्यास निधी उपलब्ध करण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या 128 व्या जयंती निमित्ताने राजगुरुनगर नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले, त्यावेळी नगराध्यक्ष मांदळे बोलत होते. याप्रसंगी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगरसेवक सचिन मधवे, संपदा सांडभोर, स्नेहलता गुंडाळ, रेखा क्षोत्रीय, संगीता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या रंजना रोकडे, अलका जोगदंड, वामन बाजारे, मिलिंद डोळस, सचिन अंकुश, यश गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे पी. के. पवार, अशोक कडलक, सिद्धार्थ कडलक यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष मांदळे म्हणाले की, शासनाच्या नागरोत्थान योजनेतून शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारक बांधण्यासाठी निधी मिळेल. डॉ. आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या नावावर असलेल्या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास हा मार्ग मोकळा होईल. या संदर्भात गेली अनेक दिवसांपासून समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, मार्ग निघाला नाही. समितीच्या माध्यमातून या ठिकाणी फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचे स्मारक बांधण्याची मागणी होत आहे मात्र, जागा हस्तांतर करण्यास विलंब होत असल्याने हा महत्त्वाचा व राजगुरूनगरच्या वैभवात भर घालणारा प्रश्‍न मार्गी लागत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.