डेहणे उपसरपंचपद निवडणुकीचे मैदान मारले सहज

राजगुरूनगर- डेहणे (ता. खेड) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दत्तात्रय खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा गुरूवारी (दि.26) घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. अर्ज माघारीच्या वेळेत दोन अर्ज राहिल्याने उपसरपंच पदासाठी शंकर कोरडे व चंद्रकांत कशाळे यांच्यात निवडणूक घेण्यात आली. यामध्ये कोरडे यांना सहा तर कशाळे यांना केवळ एक मत पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलकृषीअधिकारी नरेंद्र वेताळ यांनी शंकर कोरडे हे उपसरपंच पदी निवडून आल्याचे जाहीर केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक सुदाम कड व नायफड सजाचे तलाठी विष्णू रूपनवर यांनी काम पाहिले.
या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य चिंधु गोविंद कशाळे, चंद्रकांत कशाळे, शंकर कोरडे, पार्वता कोरडे, पुष्पा भालेराव, स्वाती लांघी, सखुबाई कशाळे आदी उपस्थित होते.
डेहणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दत्तात्रय खाडे हे बहुमताने निवडून आले होते. त्यानंतर आज उपसरपंचपदी शंकर कोरडे निवडून आल्याने जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी सभापती रामदास माटे, माजी सरपंच नीलम खंडागळे, सीताराम कोरडे, सुनील भालेराव, रामदास कोरडे, हरिश्‍चंद्र कोरडे, संजय उबाळे, गणेश कोरडे, विस्तार अधिकारी दगडू खाडे, मनीष डोंगरे कांताराम जाधव, अनिल सोळसे, दत्ता सोळसे, ज्ञानदेव वाजे, अंतू कोरडे, राम कोरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच दत्ता खाडे, उपसरपंच शंकर कोरडे यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित सरपंच शंकर कोरडे यांनी सांगितले की, गावाच्या विकासाला प्राधान्य दिले देवून सर्वांना एकत्र घेवुन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू.

  • धुवोली-वांजळेच्या उपसरपंचपदी जठार बिनविरोध
    धुवोली-वांजळे (ता. खेड) ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शरद जिजाबा जठार यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुवोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक झाली. धुवोली ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज (दि.26) विशेष सभा घेण्यात आली. यात शरद जठार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी खोमणे, ग्रामसेवक राजाराम रणपिसे यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरिदास जठार, किरण थोरात, बिबाबाई जठार, विठ्ठल सोळसे या सदस्यांसह माजी सरपंच पांडुरंग जठार, सानाज्य जठार आदी उपस्थित होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)