डेमोक्रॅटिक पक्षाच्या सीईओपदी सीमा नंदा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅशनल कमिटीच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सीमा नंदा यांची निवड झाली आहे. ही एक महत्वाची निवड मानली जात आहे. या निवडीनंतर बोलताना त्यांनी म्हटले आहे की आम्ही देशाच्या आत्म्यासाठी लढा देत असून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळवून देण्याचा आम्ही कसोशिचा प्रयत्न करू.

गेल्या आठवड्यात 23 जुलै रोजी झालेल्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली असून पक्षाचा दैनंदिन कारभार पाहण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीमा नंदा यांनी निवडीनंतर बोलताना म्हटले आहे की देशातील प्रत्येक गरजुंना त्यांच्या समस्येवर आम्ही विधायक तोडगा देऊ. मुल्यांची जपणूक, विविधतेचे बळ, उत्तुंग कल्पनांचा अविष्कार या आधारावर आम्ही प्रत्येक समस्येची विधायक उकल करू.

देशाला प्रत्येक बाबतीत पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी अमेरिकेतील प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याच पक्षाची पताका झळकली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. त्याच उद्देशाने आपण कार्यरत राहणार असून आपण ही जबाबदारी त्याच साठी स्वीकारली आहे असेही नंदा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)