“डेक्‍कन क्वीन’मध्ये नवीन केटरिंग सेवा

1 मेपासून अंमलबजावणी : तक्रारी वाढल्याने निर्णय 

पुणे – पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांची लाइफलाइन असलेल्या डेक्कन क्विनच्या डायनिंग कारमध्ये येत्या 1 तारखेपासून नवी केटरींग सेवा सुरू होत आहे. सध्या असलेल्या टेंडर मालकाची मुदत 30 एप्रिलला संपत असून येत्या 1 मे पासून नव्याने केटरिंगची सेवा सुरू होणार आहे. जे. के. घोष यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

1930 साली डेक्कन क्‍वीनला सुरूवात झाली. तेव्हापासून 88 वर्षे डायनिंग कारची केटरिंग सेवा रेल्वे प्रशासनाने पुरविली होती. मात्र गेल्या वर्षी भारतीय रेल्वे केटरिंग आणि पर्यटन विभागातर्फे दिल्लीच्या व्हरायटी केटरिंग सर्व्हिसला डेक्कन क्वीनमधील डायनिंग कारचे टेंडर दिले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सेवा, दरांचे अधिक प्रमाण, खानपानाचा दर्जा आदींबाबत तक्रारी वाढल्या होत्या. प्रवाशांनी लेखी तक्रारीही रेल्वे प्रशासनाकडे दिल्या होत्या. यामुळे आता नवीन केटरिंगचे टेंडर आल्याने प्रवाशांनाही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे.

1 नोव्हेंबर 2017 रोजी डेक्कन क्विनच्या डायनिंग कारचे टेंडर व्हरायटी केटरिंग सर्व्हिस यांना 6 महिन्यांसाठी देण्यात आले होते. त्याची मुदत 30 एप्रिलला संपत आहे. 6 महिने मुदतवाढ मिळू शकली असती. मात्र, त्यांनी ती नाकारली. व्हरायटी सर्व्हिसवाल्यांनी 16 लाख 50 हजार, 18 टक्के जीएसटी व 10 टक्के अनामत रक्कमेत सहा महिन्यांसाठी हे टेंडर घेतले होते. तर घोष यांनी 11 लाख 55 हजार 555 रूपये, 18 टक्के जीएसटी आणि 10 टक्के अनामत रक्कमेत हे टेंडर घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)