डुंबरवाडी येथील “शरदचंद्र पवार कॉलेज’मध्ये पदवीग्रहण समारंभ

ओतूर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, डुंबरवाडी (ता. ओतूर) येथे2017-18 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ शुक्रवारी (दि. 15) उत्साहात साजरा झाला.
पदवीग्रहण समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे संचालक डॉ. रमेश काकड, प्राचार्य डॉ. जी. यू. खरात, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेली कम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. महेश चिंचोले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सचिन जाधव, संगणक विभाग प्रमुख प्रा. पूजा घोलप, महाविद्यालय परीक्षा अधिकारी प्रा. नीलेश कुऱ्हाडे, ग्रंथपाल शामराव बढे, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
पदवीग्रहण समारंभादरम्यान डॉ. काकड यांनी विद्यार्थांना पदवीव्यतिरिक्त नोकरीमधील अनुभवांचे महत्त्व समजावून सांगून उच्च पदावर कसे स्थान मिळवावे, याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता कडलग आणि रेश्‍मा बनकर या विद्यार्थिनींनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.