डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा

सहा शाखांतर्गत होणार नवीन अभ्यासक्रम
पुणे – डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून आकुर्डी येथे हे खासगी विद्यापीठ कार्यान्वित होणार असल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ. प्रभात रंजन यावेळी उपस्थित होते. या शैक्षणिक वर्षांपासून सहा शाखांतर्गत नवीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत.
या सर्व अभ्यासक्रमांची निवड करताना प्रत्येक अभ्यासक्रमाची सद्यस्थितीतील उद्योगांसाठीची उपयुक्तता, आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा, कौशल्य विकासावर आधारित छोट्या मुदतीचे अभ्यासक्रम, विद्यापीठात उद्योगांना संशोधन केंद्र उभारण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता, जगभरातील संशोधन क्षेत्रांचा होणारा विकास, आतंर व अंतर्गत विद्या शाखेतील परस्पर सहकार्याच्या संधी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक तथा संशोधनाचा कल इत्यादी बाबींचा विशेष विचार केला गेला असे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यावसायिकांकडून कौशल्याचे परीक्षण होणार असून, प्रात्यक्षिकातून 50 टक्के शिक्षण, आघाडीच्या उद्योगांबरोबर सहकार्य करार, आंतरराष्ट्रीय सहकार्य करार, व्यावसायिक अभ्यासक्रम, परदेशी भाषांचे अभ्यासक्रम, स्किल इंडिया मिशन, सुसज्ज प्रशिक्षण प्रयोगशाळा ही अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये आहेत. जागतिकीकरणाच्या या युगामध्ये जागतिक पातळीच्या मानांकानानुसार गुणात्मक मनुष्यबळ ही काळाची गरज आहे त्याला अनुसरून या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय करार केले आहेत.
सध्या जागतिक स्तरावरील युनायटेउ किंगडम, श्रीलंका, इटली, लिथ्वेनिया आदी देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करारही झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक आदान-प्रदानद्वारे उच्च शैक्षणिक गुणवत्ता राखली जाणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या विद्यापीठाचा जगभरातील सुमारे 20 नामवंत विद्यापीठांशी अभ्यासक्रम, संशोधन, मनुष्यबळ इत्यादी साठीचा सहकार्य करार अस्तित्वात येईल अशी माहिती देण्यात आली.

या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणारे अभ्यासक्रम
बॅंकिंग व फायनान्स, ऑडिट व टॅक्‍सेश, बिझनेस ऍनालिस्ट, लॉजिस्टिक व सप्लाय चेन मॅनेजमेंट, डिजिटल मीडिया, ऍडव्हर्टायझिंग व पब्लिक रिलेशन्स, ब्यूटी व वेलनेस, बायोटेक्‍नॉजॉजी, कम्युनिकेशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, युजर एस्सपिरिअन्स डिझाईन, आयटी इन्फ्राक्‍चर, सिस्टिम व सेक्‍युरिटी, क्‍लाऊड टॅक्‍नोलॉजी व इन्फॉरर्मेशन टेक्‍नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्रस, नॅसकॉमचे सहकार्य आदी अभ्यासक्रम यंदा सुरु होणार आहेत. तर अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल मार्केटिंग, फायनान्स मॉडेलिंग युजींग एक्‍सेल, डाटा सायन्स सर्टिकिेशन ट्रेनिंग आर प्रोग्रामिंग, सर्टिफीकेट कोर्स इन ऍडव्हान्सड इंटेरियर डिझाईन, .एमईपी को ऑरडीनेशन
सयबर सिक्‍युरिई ऍनालिस्ट, नॅसकॉम सहकार्य, मोबाईल ऍप्लिकेशन आदींचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)