पिंपरी- पिंपरीतील डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ डी. वाय. पी. व्ही. पी. च्या विद्यार्थ्यांनी ” आर- अवेअरनेस’ हा वाहतूक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चौकांमध्ये राबविला. यामध्ये 100 विद्यार्थी गटा-गटाने विविध चौकांमध्ये उभे राहून हेल्मेट घालून वाहन चालविणारे दुचाकीस्वार, सिटबेल्ट वापरणारे चारचाकी वाहन चालक, लाल दिवा लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगमागे वाहने थांबवून पादचाऱ्यांना मार्ग देणारे वाहन चालक यांचे कौतुक करत होते. तर वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक शिस्त ही कशी महत्वाची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांच्या या उपक्रमात पिंपरी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष पाटील, शाम साळुंखे, मल्लीकार्जुन पुजारी, दीपक घाडगे, सुरेश धनगे व इतर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. पिंपरी चौकात प्रा. धीरज अग्रवाल व अमेय पाटल यांच्या मार्गदर्शनाखाली रो. कमलेश मंडल, रो. प्रणव बनकर, रो. श्रावनी खरात, रो.अंकिता उलमाले, रो. अभिषेक यादव, रो. तनय मुरवडे, रो. प्रभज्योत चव्हाण, रो.राहुल मुळे, रो.सृष्टी दिग्गीकर, रो.आदित्य सिंग , रो. अभिषेक रावत, रो रोहन गवस, रो. तेजस अग्रवाल व इतर विद्यार्थ्यांनी राबविला.
संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश माळी, उपप्राचार्य डॉ. प्रमोद पाटील , अधिष्ठाता डॉ उर्मिला पाटील , रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष रो. गणेश जामगांवकर यांनी या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.