डीबीटी’साठी 27 हजार 627 अर्ज

लाभार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता 13 लाखांच्या वाढीव निधीची तरतूद ;
कडबाकुट्टी यंत्राला सर्वांधिक 5 हजार 454 अर्ज

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 31 – वैयक्तीक लाभाच्या योजने (डीबीटी) अंतर्गत कृषी विभागाकडून 75 टक्के अनुदानावर मिळणाऱ्या शेती औजारे आणि साहित्यांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून 27 हजार 627 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कडबाकुट्टी यंत्राला असून, 5 हजार 454 जणांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, लाभार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि कृषी विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी मुळ निधीमध्ये 13 लाखांच्या वाढीव निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृषी विभागाकडून 75 टक्के अनुदानावर शेती औजारे आणि साहित्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध एचपीचे पंप संच, पाईप, पिक संरक्षण औजारे आणि सुधारित औजाऱ्यांमध्ये सायकल कोळपे, ट्रॅक्‍टरचलित दोन फाळी सरी रिजर आणि दोन एचपी इलेक्‍ट्रीक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह याचा समावेश आहे. या योजनेबाबत कृषी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील खैरनार आणि त्यांच्या टीमने जिल्ह्यात जनजागृती केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला असून, 27 हजार 627 लाभार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये सर्वाधिक अर्ज जुन्नर तालुक्‍यातून 4 हजार 532 एवढे आले असून, कडबाकुट्टीसाठी 1 हजार 89 अर्ज आहेत. त्यापाठोपाठ बारामती येथून 3 हजार 551 अर्ज आले असून 90 एमएम पाईपसाठी 803 आणि कडबाकुट्टीसाठी 698 अर्ज आले आहेत. खेड तालुक्‍यातून तीन हजार तर शिरूर तालुक्‍यातून 3 हजार 178 अर्ज आले आहेत. यावर्षी कडबाकुट्टी यंत्राबरोबर 90 एमएम. पी.व्ही.सी. पाईपसाठी 4 हजार 491 अर्ज आले असून, प्लॅस्टिक क्रेटसाठी 1 हजार 851 अर्ज आले आहेत. प्लॅस्टिक ताडपत्रीसाठीला 3 हजार 213 जणांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, 3 एचपी पेट्रोल-डिझेल आणि पेट्रोल-केरोसिन पंप संचला सर्वात कमी अनुक्रमे 257 आणि 527 अर्ज आले आहेत. तसेच 75 एमएम पाईपसाठी केवळ 184 जणांनी अर्ज केले आहेत.


लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाणणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती यांनी वाढीव निधीची तरतूद केली असून, एकूण 5 कोटी 52 लाख 90 हजार रुपये निधीची तरतूद आहे.
– सुनील खैरनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

———————
75 टक्के अनुदानासाठी आलेले अर्ज
सर्वाधिक अर्ज हे जुन्नर तालुक्‍यातून 4 हजार 532 इतके आले आहेत. त्यापाठोपाठ बारामती येथून 3 हजार 551, शिरूर 3 हजार 178, खेड 3 हजार, आंबेगाव 2 हजार 39, दौंड 2 हजार 521, इंदापूर 2 हजार 214, भोर 1 हजार 837, पुरंदर 1 हजार 565, हवेली येथून 1 हजार 93 अर्ज आले आहेत; तर सर्वांत कमी अर्ज हे वेल्हा तालुक्‍यातून 391, मुळशी येथून 425 आणि मावळ येथून 581 आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)