डीजिटलमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला

शिवाजी खराडे : शहरटाकळी जि. प. शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप
भाविनिमगाव – लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध झाल्याने पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षणाचा पाया असलेल्या इयत्तेत मुलांना काळाची गरज असलेले डिजिटल शिक्षण मिळत असल्याने आज प्राथमिक शाळेतील मुलांच्या गुणवत्तेत कमालीची वाढ झाली आहे. शाळेच्या डिजिटलीकरणामुळे प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचवल्याचे प्रतिपादन युवा नेते शिवाजी खराडे यांनी केले.
शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच चौथीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्र प्रमुख रमेश गोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मडके, सदस्या शुभांगी कुंडकर, मुख्याधापक उषा शेटे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला समय सुचक असलेले घड्याळ व थोर नेत्यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक वसंतराव काकडे, शिला पठाडे, कविता बामदळे, रमेश गायकवाड, राजाभाऊ इंगळे यांनी परिश्रम घेतले. आभार चौथीचे वर्गशिक्षक वसंत काकडे यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)