डीएसके प्रकरण : अभियंता राजीव नेवासकर यांना जामीन

 

विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांचा आदेश

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – ठेवीदारांची फसवणूक केलेल्या डी. एस. कुलकर्णी प्रकरणात अभियंता राजीव नेवासकर यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जायचे नाही, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखा येथे हजरी लावणे, या अटीवर 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्‍यावर न्यायालयाने हा जामीन मंजुर केला आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
बोगस बजेट तयार करून भांडवली लाभावरील कर वाचविल्याप्रकरणात नेवासकर यांना अटक करण्यात आली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार आणि ऍड प्रीतेश खराडे यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. नेवासकर यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या कलमानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी कोणत्याही गुंतवणूकदारांची फसवणूक केली नाही. गुंतवणूकदारांना डीएसकेंच्या कंपनीत गुंतविण्यास भागही पाडले नाही. त्यामुळे एमपीआयडी लागूच होत नाही. उपलब्ध पुराव्यावरून त्यांनी भांडवली लाभावरील कर वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा, असा युक्तीवाद ऍड. नहार यांनी केला होता. तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडत जामिनाला विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत नेवासकर यांना जामीन मंजुर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)