डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी आयसीयूत!

प्रकृती स्थीर : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
चेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कडगमचे (डीएमके) अध्यक्ष एम.करुणानिधी यांना शुक्रवारी मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

एम. करुणानिधी यांच्या रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न डॉक्‍टरांचे पथक करत असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 94 वर्षीय करुणानिधी दीर्घ काळापासून आजारी आहेत. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी चेन्नईतील गोपालापुरममधील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु होते.
दरम्यान, करुणानिधी यांचे पुत्र एमके अलगिरी, एमके स्टॅलिन आणि मुलगी कनिमोझी रुग्णालयातच आहेत. तर करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित सकाळी रुग्णालयात त्यांची भेट घेतली. करुणानिधी यांची प्रकृती आता स्थिर असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन डीएमकेचे नेते ए. राजा यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी मंत्री आणि एआयएडीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांसह करुणानिधी यांची भेट घेतली. यावेळी ते डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनाही भेटले. एमआयएडीएमकेच्या नेत्यांनी करुणानिधी यांच्या गोपालापुरमधील निवासस्थानी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी
दुसरीकडे करुणानिधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने समर्थक रुग्णालयाबाहेर पोहोचले आहेत. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी समर्थक प्रार्थना करत आहेत. समर्थकांची संख्या पाहता रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)