‘डीएचएफएल’मध्ये तब्बल ३१,००० कोटींचा घोटाळा ; भाजपला निधी दिल्याचा कोब्रापोस्टचा गंभीर आरोप

नवी दिल्ली: डीएचएफएल कंपनीने तब्बल ३१,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खुलासा कोब्रापोस्ट या वृत्तसंस्थेने केला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच धक्कादायक म्हणजे डीएचएफएलने मोठ्या प्रमाणात निधी अवैध पद्धतीने भाजपला दिल्याचे कोब्रापोस्ट म्हटले आहे.

डीएचएफएल कंपनीचे प्रायोजक असलेल्या वर्धवान ग्रुपने भाजपला तब्बल १९.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. डीएचएफएल कर्जबाजारी असताना आणि वार्षिक नफा १९ कोटींहून कमी असताना देखील डीएचएफएलने भाजपला इतका निधी दिलाच कसा? असा प्रश्न कोब्रापोस्टने उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक धक्कादायक खुलासे कोब्रापोस्टने केले आहेत, गुजरात आणि कर्नाटक निवडणुकांच्या आधी अनेक झोपडपट्टी विकास समित्यांना आणि स्थानिक राज्य सरकारांसोबत काम करणाऱ्या कंपनीना डीएचएफएलने कागदपत्रांची पूर्तता न करताच १,१६० कोटी आणि १३२० कोटींचे कर्ज दिले होते. आणि परतफेड झाले नसल्याचे तसेच ज्या प्रकल्पासाठी हा पैसा दिला त्यासाठी देखील हा पैसा वापरला नसल्याचे कोब्रापोस्टने म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)