डी’आर्सी शॉर्टच्या 23 षटकारांसह 257 धावा

रोहित शर्माचा विक्रम थोडक्‍यात बचावला

सिडनी: ऑस्ट्रेलियातील जेएलटी वन डे सामन्यांत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि क्‍वीन्सलॅंड यांच्यातील लढतीत डी’आर्सी शॉर्टने 148 चेंडूत 257 धावा करताना अ दर्जाच्या क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम खेळी साकारली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ही अविस्मरणीय खेळी साकारली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शॉर्टने या सामन्यात 15 चौकार आणि 23 षटकारांची आतषबाजी केली. या खेळीसह त्याने भारताचा सलामीवीर शिखर धवनला मागे टाकले, तर रोहित शर्माचा विक्रम थोडक्‍यात बचावला. शॉर्टने 83 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढील 45 चेंडूत त्याने शंभर धावा जोडल्या. या खेळीत त्याने 23 षटकार खेचले आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मन्‍रोनंतर वन डे सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्याने केला. ऑस्ट्रेलियाच्या बेन डंक, फिलिप ह्युजेस आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या नावावर या क्‍लबकडून द्विशतके जमा आहेत.

अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीचा विक्रम इंग्लंडच्या लिस्टर ब्राउनच्या नावावर आहे. त्याने 2002 मध्ये सरेचे प्रतिनिधित्व करताना ग्लॅमोर्गन क्‍लबविरुद्ध 268 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या रोहित शर्माचा क्रमांक येतो रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 264 धावांची खेळी केली होती.

ए लिस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी (एकदिवसीय सामने)

1) लिस्टर ब्राउन (268), सरे वि. ग्लॅमॉर्गन, ओव्हल 2002
2) रोहित शर्मा (264), भारत वि. श्रीलंका, कोलकाता 2014
3) डी’आर्सी शॉर्ट (257), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया वि. क्‍वीन्सलॅंड, हर्स्टविल्ले 2018
4) शिखर धवन (248), भारत वि. दक्षिण आफ्रिका, प्रिटोरिया 2013.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)