डिंग्रजवाडी पोटनिवडणुकीत नमिता गव्हाणे बिनविरोध

शिक्रापूर- आदर्शग्राम डिंग्रजवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तीन जागासांठी घेतलेल्या पोटनिवडणुकीत नमिता दत्तात्रय गव्हाणे यांची बिनविरोध तर, संदीप माणिक गव्हाणे, विजया शहाजी गव्हाणे हे बहुमताने विजयी झाले आहेत. मात्र, डिंग्रजवाडीत कायमस्वरुपी बिनविरोध निवडणूक घेण्याच्या उपक्रमाला छेद लागला आहे.

डिंग्रजवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायतीचे सदस्य बापू मल्हारी गव्हाणे, गौरी आकाश नाबगे आणि नंदा संदीप गव्हाणे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तीन जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या वेळेत प्रभाग क्रमांक दोनच्या नमिता दत्तात्रय गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उरलेल्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यातील प्रभाग क्रमांक 1 मधील संदीप 193 मते मिळवून तर, प्रभाग क्रमांक 2 मधून विजया गव्हाणे 204 मते मिळवून विजयी झाले आहेत. यावेळी माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, राहुल गव्हाणे आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांचे फटाक्‍यांची आतिषबाजी भंडारा आणि गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. संदीप गव्हाणे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. मात्र, गेल्या अडीच वर्षांपूर्वी बिनविरोध निवडणूक घेत इतर गावांना आदर्श घालून दिलेल्या डिंग्रजवाडी गावाला बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखता आली नाही. यावेळी संदीप गव्हाणे यांचा कोरेगाव भीमा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे राजेश ढेरंगे, हनुमान पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रामदास ढेरंगे, कोरेगाव भीमा सोसायटीचे माजी अध्यक्ष मारुती ढेरंगे, अल अमीन संस्थेचे अमीर इनामदार, पप्पू कुटे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)