डाळींब, कलिंगडाच्या भावात वाढ ः संत्रांच्या भावात घट

पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात खरबूज, पपई, कलिंगड आणि डाळिंबाना मागणी वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे डाळींब, कलिंगड आणि संत्रा वगळता सर्व फळांचे भाव स्थिर आहेत. डाळींब, कलिंगडच्या आवकेत वाढ होऊनही भावात 5 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, संत्र्यांच्या भावात घट झाली आहे. मालवाहतूकदारांच्या संपामुळे लिंबाची निम्म्याने घटलेली आवक पूर्वपदावर आली आहे. त्याला मागणीही चांगली असल्याने गेल्या आठवड्यातीच्या तुलनेत भाव स्थिर आहेत.
रविवारी येथील फळबाजारात अननसची 2 ट्रक, मोसंबीची 50 टन, संत्रीची 1 टन, डाळिंबाची 60 ते 70 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबाची 5 ते 6 हजार गोणी, चिक्‍कूची 300 डाग, पेरूची 300 क्रेटस्‌, कलिंगडची 20 ते 25 टेम्पो, खरबुजची 8 ते 10 टेम्पो, सिताफळाची 5 टन इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 30-100, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 90-250, (4 डझन ) : 40-100, संत्रा : (3 डझन) 150-200, (4 डझन) : 100-180, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 20-80, गणेश 5-30, आरक्ता 10-50. कलिंगड : 5-10, खरबुज : 10-25, पपई : 5-25, चिक्‍कू : 100-500, पेरू (20 किलो) : 350-550, सिताफळ : 10-150, दशहरा : (10 किलो) 500-700, लंगडा (6 किलो) : 600-700, चौसा 400-600, प्लम (5 किलो) : 610-800.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)