डाळिंबाचे भाव गडगडले

पिंपरी – डाळिंबाची आवक वाढल्याने भाव गडगडले असून फळबाजार “लालबुंद’ झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी डाळिंबाचे भाव 50 ते 80 रुपयांपर्यंत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून अचानक डाळिंबाची आवक वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव कमालीचे पडले आहेत.

पिंपरी येथील भाजी मार्केट येथे सर्वत्र डाळिंबाचे ढिगच्या ढिग पहायला मिळत आहेत. भाव कमी झाल्याने नागरिकांची पावले डाळींब खरेदीकडे वळाली आहेत. डाळिंबाचे भाव 20 रुपयापासून ते 30 रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत. तर पुण्यातील मार्केटयार्ड येथे 15 किलोचा कॅरेट 70 ते 80 रुपयापर्यंत व्यापाऱ्यांना मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे भाव कमी झाल्याने ग्राहक खुश असताना दुसरीकडे डाळींब उत्पादकांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. वाहतूक व मजुरीवरचा खर्च वसूल होणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

ढगाळ वातावरण आणि सतत पाऊस असल्या कारणाने ग्राहक सुद्धा स्वस्त झालेल्या डाळिंबाची म्हणावी तशी खरेदी करत नाही. अचानक मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आवक वाढल्याने एकदमच डाळिंबाचे भाव कमी झाले आहेत.
– किसन खुडे, डाळींब विक्रेते, पिंपरी मार्केट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)