“डाई-ईची’ कामगारांचे आंदोलन सुरूच

पिंपरी – कासारवाडी येथील डाई-ईची प्रकल्पाचे गुजरात येथे स्थलांतरण सुरु आहे. या विरोधात कामगारांनी आज (शनिवारी) सलग सहाव्या दिवशी उपोषण केले.

पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कारखाना शहरातील जुन्या उद्योगांपैकी एक आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कारखाना गुजरात येथे स्थलांतरीत करण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यासाठी कारखान्यातील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कोणतीही पुर्वकल्पना न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याविरोधात हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. 33 दिवस ठिय्या आंदोलन करुनही त्याची दखल न घेतल्याने छबू जवळकर, विनायक पोतदार या कामगारांनी मागील सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

उत्पादनाचे स्थलांतरण थांबवावे. सर्व कामगारांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची सेवा उपदान (ग्रॅज्युईटी) रक्कम व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनाही फरकासह ग्रॅज्युईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे, 2008 पासून प्रलंबित असलेला वेतन करार मार्गी लावावा, उत्पादनाचे स्थलांतरण रद्द करुन कारखाना पुर्ववत सुरु करावा आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)