ठेवी ट्रस्टकडे जमा न केल्यास 2 जूनला गाव बैठक

नारायणगाव- येथील श्री मुक्ताबाई देवी व काळेबा देवस्थान ट्रस्टच्या सुमारे 1 कोटी 14 लाख रुपयांच्या ठेवी देवस्थानचे संचालक मंडळ आणि सध्या ट्रस्टचा कारभार पाहणारे ग्रामस्थ यांच्यातील वादामुळे हे पैसे कधी मिळणार, यासाठी आज (दि. 4) झालेल्या गाव बैठकीत 2 जूनपर्यंत हे पैसे संबंधित पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टकडे जमा न केल्यास येत्या 2 जूनला गाव बैठक घेऊन त्यांना जाब विचारू, असा निर्णय घेण्यात आला.

नारायणगाव (ता. युन्नर) येथील श्री मुक्ताबाई देवी व काळेबा मंदिरात आज (दि. 4) गाव बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 2017 पर्यंत ट्रस्टचा कारभार पाहणाऱ्या संचालक मंडळाने समाज मांडीत्तर आणि ट्रस्टच्या सुमारे 1 कोटी 14 लाख रुपयांच्या ठेवी नारायणगावातील विविध पतसंस्था आणि नागरी बॅंकेत ठेवल्या आहेत. 2017 मध्ये गाव बैठकीत त्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीचा हिशोब न देता देवस्थानचे सुमारे 1 कोटी 14 लाख रुपये ठेवींच्या स्वरूपात आपल्याकडेच ठेवले आहेत, असा आरोप काही ग्रामस्थांनी या गाव बैठकीत केला.

या संदर्भात नारायणगावचे सरपंच व यात्रा कमिटीचे अध्यक्ष योगेश पाटे यांनी मुक्ताबाई समाज मंदिराची कार्यकारणी बरखास्त करण्याचा ठराव बैठकीत घेतला. हा प्रस्ताव सरपंच योगेश पाटे यांनी ग्रामस्थांसमोर मांडला असता सुजित खैरे यांनी अनुमोदन दिले, तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांनी 1 जून 2019 पर्यंत ठेवी ट्रस्टकडे जमा न केल्यास 2 जूनला गाव बैठकीचे आयोजन करण्यात येईल असा ठराव मांडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ शेटे आणि काही ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ज्यांच्याकडे ठेवी आहेत त्यांच्या घरी जाऊन ट्रस्टच्या ठेवींची रक्कम वसूल करावी, अशी भूमिका मांडली. यावेळी सरपंच पाटे आणि संतोष खैरे, सुजित खैरे यांनी संबंधितांना एका महिन्याची मुदत देऊन 2 जूनच्या गाव बैठकीत निर्णय घेऊ असे सांगून, या बैठकीत 2018-19 च्या जमा खर्चाला मान्यता देण्यात आली.

यावेळी देविदास भुजबळ यांनी सर्व जमा खर्च गांवकऱ्यांसमोर वाचून दाखविला. या बैठकीतील चर्चेत सुजित खैरे, किरण वाजगे, आशिष वाजगे, दत्तोबा फुलसुंदर, राजेश बाप्ते, मंदार पाटे, गणेश पाटे, विकास तोडकरी, गणेश वाजगे आदींनी भाग घेतला. मुक्ताबाई देवस्थानच्या गाळ्यांचा लिलाव गणेश मारुती पाटे यांनी 12 लाख 50 हजार रुपयांना घेतला. आनंद डेरे, रामदास तोडकरी, दादाभाऊ खैरे, मयूर विटे, अभिजीत पाटे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.