ठाणे : बुलेट ट्रेनला भूमीपुत्रांचा विरोध

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हावी, अशी कोणतीही मागणी स्थानिक भूमीपुत्रांनी केली नसल्यामुळे ही बुलेट ट्रेन आमच्यावर लादू नका. बुलेट प्रकल्पामुळे होणाऱ्या ऱ्हासामुळे पर्यावरणाचे अनेक दुर्मिळ घटक पुढील पिढीला पाहताही येणार नाहीत. भुपृष्ठाखालील सजीव नष्ट होतील. भूमीपुत्रांचे रेती, मच्छिमारी आणि अन्य व्यवसाय बंद झाले असल्यामुळे यापुढे कोणताही प्रकल्प आम्हाला नको. जिथे गरज आहे तिथे बुलेट प्रकल्प उभे करा, अशा शब्दांमध्ये रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावत ठाण्यातील भूमीपुत्रांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधातील बंडाचा झेंडा गडकरी रंगायतनमध्येही फडकवला.

संतप्त होऊन घोषणाबाजी करत शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत याला विरोध राहील, अशी आक्रमक भूमिका यावेळी मांडण्यात आली. ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या जनसुनावणीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा संघर्षही यावेळी उफाळून आला होता. शेतकऱ्यांनी सभागृहात समोर येऊन सरकार आणि बुलेट प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)