“ठाकरे चित्रपटाच्या मोफत शो’चे आयोजन

कोथरुड – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या “ठाकरे चित्रपटाच्या मोफत शो’चे आयोजन कोथरूड विभाग प्रमुख उमेश भेलके व युवा सेनेचे अविनाश बलकवडे यांच्या वतीने कोथरुड सिटी प्राइडमध्ये करण्यात आले होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत पहिल्या शोचे धडाक्‍यात स्वागत केले.

बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शो सुरू करण्यात आला. यावेळी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक उत्तम भेलके, शाम देशपांडे, युवा सेना प्रदेश विस्तारक राजेश पळसकर, शिव सहकार सेनेचे उपशहर संघटक राजेंद्र धनकुडे, जयदीप पडवळ, उपस्थित होते. इतर पक्षाचे कार्यकर्तेही चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)