ठरवल्यास मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते – हेमा मालिनी

जयपूर – उचलली जीभ, लावली टाळ्याला ही उक्ती काही नेते आपल्या वक्तव्यांमधून सार्थ ठरवत असतात. अशा नेत्यांच्या पंक्तीमध्ये आता भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी याही जाऊन बसल्या आहेत. मी ठरवल्यास एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, अशी दर्पोक्ती त्यांनी केली आहे.

उत्तरप्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या हेमा मालिनी बुधवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होत्या. त्या दौऱ्यावेळी एका पत्रकाराने त्यांना संधी मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का, असा प्रश्‍न विचारला. त्यावर त्या उत्तरल्या, मी ठरवल्यास एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, माझीच इच्छा नाही. कुठल्या बंधनात अडकणे मला आवडत नाही. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर माझ्या मुक्‍तपणे वावरण्यावर बंधने येतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. खासदार बनण्याआधीच मी भाजपसाठी बरेच कार्य केले. आता खासदार बनल्यावर चार वर्षांत मी माझ्या मतदारसंघात बरीच विकासकामे केली. बॉलीवूडमधील कारकिर्दीमुळेच मी खासदार बनू शकले, असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)