‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चा ट्रेलर प्रदर्शित  

मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याशिवाय कतरीना कैफ आणि फातिमासह कलाकारांची फौज चित्रपटात दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांचे अॅक्शन सीन्सस पाहून दर्शक नक्कीच चाट पडणार आहेत.

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ची कथा १७९५ मधील ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतरची आहे. कंपनी भारत व्यापार करण्यास अाली आणि हळूहळू लोकांवर राज्य करू लागले. परंतु, काही लोकांना हे मान्य नव्हते व ते आझादच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधात विद्रोह करतात. या चित्रपटात अमिताभ बच्चन आझादची भूमिका करत आहेत तर आमिर खान फिरंगीच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकमेकांच्या विरोधात असण्याची शक्यता ट्रेलरवरून वर्तविण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट यशराज चोप्राच्या आतापर्यंतच्या करिअरमधील बिग बजेट चित्रपट आहे. दिवाळीत म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://youtu.be/zI-Pux4uaqM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)