ट्रोलिंग करणाऱ्याला तापसीचे परखड उत्तर 

ट्रोलिंग होणे कोणालाही चुकलेले नाही. विशेषतः बॉलिवूड सेलिब्रिटीना तर हमखास ट्रोल केले जातेच जाते. अलिकडे असेच तापसी पन्नूलाही काही जणांनी विनाकारण ट्रोल करायला सुरुवात केले होते. मात्र तापसीने या ट्रोलर्सना परखड उत्तर देऊन गप्प केले. “तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील सर्वात वाईट दिसणारी ऍक्‍ट्रेस आहे. तिला पुन्हा कधीही कोणत्याही सिनमामध्ये बघण्याची आपली ईच्छा नाही.’ असे एका ट्रोलरने सोशल मिडीयावर म्हटले होते. त्यावर तापसीने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे.
माझ्याकडे आताही 3 सिनेमे आहेत. यापेक्षाही आणखीही सिनेमे आपल्याकडे येणार आहेत. “मुल्क’, “मनमर्झियां’ आणि “बदला’ हे तीन सिनेमे तर मी ऑलरेडी साईन केलेले आहेत. त्यामुळे मला थोडे आणखीन सहन करावेच लागेल, असे तिने म्हटले आहे. एका दुसऱ्या ट्रोलरने म्हटले आहे की तापसीने सिनेमे थिएटरमध्ये येतात आणि जातात. त्यावर हे सिनेमे एन्टरटेनमेंट तर करतात ना. मग झाले तर, माझे काम झाले, असे उत्तर तापसीने दिले आहे. तापसीच्या “नाम शबाना’ने तिच्या नावाची मोठी हवा केली होती. त्यात तिने अक्षय कुमारच्या बरोबरीचे ऍक्‍शन स्टंट केले होते. त्यावरून तिचे खूप कौतुकही झाले होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)