ट्राफीक पोलीसांना जरा आवरांच…!

सम्राट गायकवाड
लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही असे जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात त्या प्रकारे देशातच काय तर साध्या ग्रामपंचायतीमध्ये आज ही त्याप्रमाणे कारभार होताना दिसून येत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दोष न देता लोकशाहीचा मुळ पाया असलेला सामान्य नागरिक जोपर्यंत जबाबदारीने कर्तव्य पार पाडणार नाही अन्‌ व्यवस्थेला जाब विचारणार नाही तोपर्यंत लोकशाही केवळ कागदावरच राहणार आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे लोकशाही मुल्यांची खऱ्या अर्थाने रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावर आहे.

मात्र, सध्या साताऱ्यात पोलीस प्रशासनातील विशेषत: वाहतूक तथा ट्राफीक पोलीसांची अरेरावी वाढत चाललेली आहे. त्यांच्याकडून कायदेशीर कोंडी करण्याचा प्रयत्नांमध्ये सध्या वाढ होत आहे. शहरात एका बाजूला ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे पर्यायी रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. कोंडी दूर करण्याची प्राधान्याने जबाबदारी ही ट्राफीक पोलीसांवर आहे. जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यात यावी यासाठी त्यांच्या सोबतीला होमगार्ड देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तो आर्थिक ताण हा कर देय करणाऱ्या नागरिकांवर अप्रत्यक्ष पडत आहे. असे असताना शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचे मुख्य जबाबदारी बाजूला दूर सारून जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनधारकांना अडविण्याचा सपाटा ट्राफीक पोलीसांनी लावला आहे. वाहनचालकाकडे परवाना व गाडीची कागदपत्रे आहेत की नाही हे ट्राफीक पोलीसांनी जरूर तपासले पाहिजेच त्याला कोणताही कायदा माननाऱ्या नागरिकांचा विरोध कधीच असणार नाही. मात्र, एका बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना एकाच ठिकाणी दोन ते चार ट्राफीक पोलीस एकाच ठिकाणी थांबलेले दिसून येतात व त्यांच्याकडून केवळ पावत्या फाडण्याचे टार्गेट पुर्ण करताना दिसून येत आहेत. त्याच बरोबर गाडी अडविल्या अडविल्या वाहनधारकाच्या गाडीची थेट चावी काढून घेण्याचा बेकायदेशीर प्रकार देखील होत आहे. तसेच परवाना आणि गाडीची कागदपत्रे दाखविल्यानंतरही पीयुसी अन्‌ शुल्लक कारणांवरून वाहनधारकाला कोंडीत पकडण्याचा जो प्रकार सुरू आहे तो खेदजनक आहे.

आज सातारा शहरातून हजारो एसटी बसेस काळा धुर सोडत जातात त्यापैकी एकाही एसटी बसेसची पीयुसी चेक करण्याचे धाडस एकही ट्राफीक पोलीस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी करत नाहीत. असे असताना सर्वसामान्य वाहनधारक जो पेट्रोल अन्‌ डिझेलच्या वाढत्या दरामुळे एका बाजूला घाईगुतीला आलेला असताना व आवश्‍यक तेवढी कागदपत्रे सोबत बाळगत असताना देखील त्यांची कायद्याच्या नावाखाली पिळवणूक करण्यात येणार असेल तर ते फार काळ कोणी सहन करणार नाही.

त्याच बरोबर गेली अनेक वर्षापासून ट्राफीकमध्ये इंटरेस्ट असणारे तेच चेहरे गेली अनेक वर्षापासून आलटून पालटून दिसत आहेत. त्यांच्या सेवा पुस्तिकेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्याच बरोबर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत हे सांगितलेले वाक्‍य केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी आचरणात आणले तर येथील सातारकर आदर करेल मात्र मुळ कर्तव्य बाजूला ठेवून पिळवणूक करण्याचे प्रकार सुरूच ठेवले तर लोकशाही मार्गाने आवाज उठवायला मागे पुढे पाहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)