ट्रान्सपोर्ट असोसिएशनची “गांधीगिरी’

पिंपरी – वाहतूकदार व्यावसायिकांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष तसेच सततच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनने सलग सहाव्या दिवशी चक्‍काजाम आंदोलन केले. या बंदमध्ये सहभागी न झालेल्या वाहन चालकांना हात जोडून तसेच गुलाबाचे फुल देत “गांधीगिरी’ करण्यात आली.

इन्शुरन्सच्या टीपीपी हप्त्यामधील दरवाढ, डिझेलमधील असह्य सततची दरवाढ, अन्यायकारक टोल वसुली धोरण, प्रवासी वाहनासाठी राष्ट्रीय पातळी वरील परमीट बंधन, रस्त्यावरील पोलीस व परिवहन विभागाचा भ्रष्टाचार आणि छळवणूक , ई वे बिल आणि तातडीचे भाडे आदींचे वाहतूकदारांवरील बंधन, बस व्यावसायिक आणि दुहेरी चालक, त्यांचे गणवेश, दाखला धोरण, आयकर कलम 44 ए मधील दुरुस्ती आदी मागण्यांसाठी 20 जुलैपासून वाहतूकदार संघटनांनी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशभरातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत असला तरी काही वाहने अद्याप रस्त्यावर धावत आहेत. त्यांना या आंदोलनात सहभागी करुन घेण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आज (गुरुवारी) हे आंदोलन करण्यात आले. ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष अमित धुमाळ, कार्याध्यक्ष प्रमोद भावसार, राधेश्‍याम आगरवाल, आर. के. गुप्ता, महेंद्र गर्ग आदींनी माल वाहतुकीची वाहने थांबवून गुलाबपुष्प भेट दिले. तसेच त्यांना आंदोलनात सहभागाचे आवाहन केले.

दरम्यान, आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. निगडी येथील वाहतुकनगरीमध्ये एक हजार तर औद्योगिक परिसरात सुमारे नऊ हजार वाहने उभी आहेत. आंदोलन सुरु झाल्यापासून यामध्ये सहभागी वाहनांना वाहतुकनगरीमध्ये मोफत वाहनतळ उपलब्ध करुन दिले आहे. तसेच वाहन चालक, वाहकांना मोफत जेवण व आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती प्रमोद भावसार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)