ट्रम्प यांनी पत्रकारांना ठरवले देशद्रोही

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील पत्रकार देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या बातम्या छापून ते लोकांच्या जीवाशी खेळत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी ही प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे की माध्यमांना ट्रम्प या नावाविषयी द्वेष आहे त्यामुळे त्यांनी सरकारच्या अंतर्गत कारभाराविषयीही तपशील जाहीर केला आहे. त्यांच्या कृत्याने केवळ पत्रकारांचाच नव्हे तर अन्य अनेकांचाही जीव धोक्‍यात येऊ शकतो. त्यांची ही कृती देशद्रोही स्वरूपाची आहे असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माध्यमांना स्वातंत्र्य जरूर आहे पण त्याच बरोबर त्यांच्यावर जबाबदारीही आहे. पण जबाबदारी टाळून ते या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील माध्यम संस्था बेजबाबदारीचे वार्तांकन करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. माझ्या सरकारच्या प्रशासनाविषयी माध्यमांमध्ये ज्या बातम्या येतात त्यातील 90 टक्के बातम्या या नकारात्मक असतात असे ते म्हणाले.

आमच्या प्रशासनाने अनेक बाबतीत विधायक निष्कर्ष दिले आहेत पण त्याकडे त्यांचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे माध्यमांवरील लोकांचा विश्‍वास कमालीचा घसरला आहे. मी आपला हा महान देश केवळ ट्रम्प विरोधी भावनेतून विकला जाऊ देणार नाही. त्यांनी कितीही निराशा पसरवली तरी माझ्या नेतृृत्वाखाली देश प्रगतीपथावरच राहील असे ते म्हणाले. न्युयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टवर त्यांनी सडकून टीका केली. ते लोक सुधारण्याची शक्‍यता नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली. न्युयॉर्क टाईम्सच्या प्रकाशकांशी ट्रम्प यांनी नुकतीच व्हाईट हाऊस मध्ये चर्चा करून त्यांच्या वृत्तपत्रातील खोट्या आणि नकारात्मक बातम्या त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)