ट्रम्प जाणार इस्त्रायलच्या नव्या राजधानीला

वॉशिंग्टन – अमेरिकेने इस्त्रायलला जेरूसलेम येथे राजधानी स्थलांतरीत करण्यास पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाला जगभरातून विरोध झाला असला तरी स्वत: ट्रम्प यांनी मात्र या विरोधाला जराही भीक घातलेली नाहीं. त्यांनी इस्त्रायलच्या या कृत्याला पाठिंबा म्हणून अमेरिकेचा दूतावासही जेरूसलेमला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन दुतावासाच्या उद्‌घाटनासाठीच म्हणून ते तिकडे जात आहेत.

स्वत: ट्रम्प यांनी आज ही माहिती देताना म्हटले आहे की, इस्त्रायलला त्यांचे जेरूसलेम हे शहर पुर्णपणे मिळवून देण्याचे आश्‍वासन अनेक अमेरिकन अध्यक्षांनी दिले होते. त्यामुळे आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आम्हीच त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हे आश्‍वासन दिले असल्याने अमेरिकेन दुतावासाच्या जेरूसलेम येथील उद्‌घाटनासाठी मी तिकडे जाणार आहे. ते म्हणाले की ही दुतावासाची इमारत बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी माझ्याकडे एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव पाठवला होता पण आम्ही तीन ते चार लाख डॉलर्स मध्येच तेथे टुमदार इमारत उभारली आहे. ती अनेक वर्षांसाठी पुरेशी आहे. नंतरच्या काळात तेथे आणखी मोठी इमारत बांधता येईल असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)