टोळक्‍याकडून पोलिसाला दमदाटी; चौघांना अटक

पुणे – हेल्मेट सक्तीची कारवाई केली म्हणून एका टोळक्‍याने वाहतूक पोलिसाला दमदाटी करत रस्ता अडवला. ही घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील राजस सोसायटी येथे बुधवारी दुपारी घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश खोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन दादासो घालमे(वय 23), प्रसाद अरविंद खुटवड(वय26),ओंकार चंद्रकांत येनपूरे (वय19), विकी दादासाहेब घालमे ( वय 26) यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेले वाहतूक अधिकारी व कर्मचारी हेल्मेट सक्तीसंदर्भात राजस सोसायटी चौकात कारवाई करत होते. यावेळी सचिन घालमेने वेडीवाकडी गाडी चालवत ती फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यास थांबवून वाहन परवाना आणि हेल्मेटची विचारणा केली. त्यानंतर त्याने वादावादी घालत, शिवीगाळ करत फिर्यादीच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याने गाडी रस्त्यावर लावून फोनवरून इतर साथीदारांना बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून फिर्यादीशी वाद घालून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसचे रस्त्याच्यामध्येच बसून कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अडवणूक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.लाड करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)