टोमॅटो, दोडका, काकडी, कारली, पावटा, तोतापुरीच्या भावात घट : उर्वरित फळभाज्या स्थिर

सोमवारचा बंद आणि पावसाच्या उघडीमुळे फळभाज्यांची मोठी आवक

पुणे- श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी सोमवारी (दि. 30 जुलै) फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद ठेवण्यात येणार आहे. याखेरीज, पुणे विभागात मागील काही दिवसांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने मार्केटयार्डात सलग पाचव्या आठवड्यात भाजीपाल्याची मोठी आवक झाली. त्यामुळे टोमॅटो, दोडका, काकडी, कारली, पावटा, तोतापुरीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सुमारे 200 ट्रक शेतमालाची आवक झाली. कर्नाटक येथून 7 ते 8 टेम्पो मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून पाच ते सहा ट्रक कोबी, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून 18 ते 20 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 6 ते 7 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश इंदौर येथून 5 ते 6 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेपाच ते सहा हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 2400 ते 2500 पोती, टॉमेटो पाच ते साडेपाच हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, भुईमूग 200 पोती, पावटा 7 ते 8 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, कांद्याची 75 ते 80 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 45 ते 50 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 100-130, बटाटा : 150-180, लसूण : 150-300, आले : सातारी : नवीन : 250-300, जुना : 400-450, भेंडी : 200-300, गवार : गावरान : 350-400, सुरती : 200-300, टोमॅटो : 60-100, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 300-400, दुधी भोपळा : 60-120, चवळी : 150-200, काकडी : 60-100, कारली : हिरवी 240-280, पांढरी : 150-160, पापडी : 200-250, पडवळ : 160-180, फ्लॉवर : 80-100, कोबी : 80-100, वांगी : 200-300, डिंगरी : 140-160, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 250-300, तोंडली : कळी 220-240, जाड : 90-100, शेवगा : 300-400, गाजर : 120-160, वालवर : 300-350, बीट : 100-140, घेवडा : 400-500, कोहळा : 100-150, आर्वी : 250-300, घोसावळे : 160-180, ढेमसे : 150-300, भुईमूग : 250-350, पावटा : 200-250, मटार : स्थानिक : 500, परराज्य : 420-450, तांबडा भोपळा : 60-100, कैरी : तोतापुरी : 200-220, सुरण : 260-280, मका कणीस : 80-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)