टेम्पो व दुचाकीच्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

लोणावळा – जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. 26) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मृत विद्यार्थी आणि जखमी हे लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

शुभम वाल्मिक मोरे (वय 26, रा. जालना) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर शुभम विलास जाधव (वय 20) आणि विक्की दयानंद वाघमारे (वय 22) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबत शुभमचा मित्र शुभम सुनील शेडगे याने लोणावळा शहर पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड महाविद्यालयाचे 20 ते 25 विद्यार्थी त्यांचे मित्र दर्शन सिरोया व ऋषीकेश देशमुख यांच्या वाढदिवसाचे जेवण करण्याकरिता दुचाकीवरुन खोपोलीला गेले होते. जेवण करुन पुन्हा लोणावळ्यात परतत असताना खंडाळ्यातील कोहिनूर पॅलेसच्या गेटसमोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पुण्याहून मुंबईच्या दिशेने वेगात निघालेल्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दुचाकीवरील जखमी झालेल्या तिघांनाही त्यांच्या मित्रांनी लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र शुभमच्या डोक्‍याला मार लागल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)