टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पिंपरी – भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाली. हा अपघात शुक्रवारी (दि.27) मोशी येथे घडला. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.

यामध्ये राजेंद्र सदाशिव चव्हाण (वय-35, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून विलास गंगाधर कुसाळकर (वय-35, रा. चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. भरत मोहिते यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चव्हाण हे मोहिते यांच्या आईला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा आणायला दुचाकीवरुन गेले होते. यावेळी कुसाळकर यांनी भरधाव वेगात येत चव्हाण यांच्या गाडीला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन चव्हाण यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)