टेबल टेनिस स्पर्धा: निरंजन उपाध्ये, शिवराज पाटील, यांची विजयी आगेकूच 

निरंजन उपाध्ये, शिवराज पाटील, अजय कांबळे, योगेश रायखेलकर यांची विजयी आगेकूच 
डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धा 
पुणे: निरंजन उपाध्ये, शिवराज पाटील, अजय कांबळे, योगेश रायखेलकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करूताना पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक महाराष्ट्र प्रौढ राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष 40 वर्षावरील गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, सांघिक गटात किंग पॉंग, उषाप्रभा ट्रान्सलाईन्स, केआरसी अ पीवायसी अ या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष 40 वर्षावरील गटात पहिल्या फेरीत पुण्याच्या निरंजन उपाध्येने मुंबई शहराच्या प्रदीप कोळंबकरचा 13-11, 11-9, 11-8 असा तर मुंबई शहराच्या शिवराज पाटीलने पुण्याच्या प्रकाश सोलापुरेचा 11-4, 11-4,7-11, 11-3 असा पराभव करूत विजयी आगेकूच केली. पुण्याच्या नचिकेत देशपांडे याने सोलापूरच्या विनोद मग्गीचा 11-6, 11-6,11-6 असा सहज पराभव केला. नाशिकच्या पंकज रहाणेने प्रीतम शेनॉयला 11-3, 11-2, 11-5 असा एकतर्फी पराभव केला. तर पुण्याच्या शेखर काळेने मनोज वाघवेकरवर 11-5, 11-8, 11-5 असा विजय मिळवला.
सांघिक गटात पीवायसी अ संघाने बीकेएलपी अ संघाचा 3-1असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून उपेंद्र मुळ्ये, शेखर काळे यांनी अफलातून कामगिरी केली. उषाप्रभा ट्रान्सलाईन्स संघाने सेंच्युरी वॉरियर्स अ संघावर 3-0अशा फरकाने विजय मिळवला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)