टेनिस स्पर्धा: पार्थ चिवटे, धरणीधर मिश्रा, रोहित शिंदे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस स्पर्धा

पुणे: पार्थ चिवटे, रोहित शिंदे, धरणीधर मिश्रा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करूताना मंदार वाकणकर टेनिस अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस 2018 स्पर्धेत पुरुष खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना कोर्टवर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत पार्थ चिवटे याने वेंकटेश आचार्य याचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात पहिल्या मिनिटा पासुनच पोआर्थ चिवटेने सामन्यावर वर्चस्व गाजवले. सामन्यात सुरेख खेळ करताना पार्थने वेंकटेश आचार्यवर दबाव आणन्याचा प्रयत्न केला, मात्र वेंकटेश आचार्यने सामन्यात पुनरागमन करत पार्थला तितक्‍याच जोरदार प्रत्युत्तर देत सामना गाजवला. मात्र अखेरीस पार्थने सामना आपल्या नावे करताना वेंकटेशचा संघर्ष 6-4 असा मोडीत काढला.

तर अन्य एका सामन्यात अव्वल मानांकित रोहित शिंदे याने अंशुल सातववर 6-2 असा सहज विजय मिळवला. या सामन्यात रोहित शिंदेने पहिल्याच मिनिता पासूनच अंशूलवर वर्चस्व गाजवताना दबाव वाढवला त्यामुळे अंशूलला अपेक्षीत खेळ करता आला नाही आणि त्याने रोहित समोर 6-2 अशी सपशेल शरणागती पत्करली. तर स्पर्धेत दुसरे मानांकन असणाऱ्या धरणीधर मिश्राने बिगर मानांकित रोहन फुलेचे आव्हान 6-2 असे सरळ लढतीत मोडीत काढले.

सविस्तर निकाल:
हौशी गट: उपांत्यपूर्व फेरी:
रजत परमार वि.वि. अविनाश हूड 6-3;
सौतिक घोष वि.वि. नितीन सावंत 6-5(2);
आर्यन हूड वि.वि. विवेक खडगे 6-2;

पुरुष एकेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
रोहित शिंदे (1) वि.वि. अंशूल सातव 6-2;
मैत्रेयी भगत वि.वि. ओंकार अग्निहोत्री 6-1;
पार्थ चिवटे वि.वि. वेंकटेश आचार्य 6-4;
धरणीधर मिश्रा (2) वि.वि. रोहन फुले 6-2;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)