टेक्‍सासमध्ये गोळीबाराच्या घटनेत 5 ठार

कोर्प्स ख्रिस्ती (अमेरिका) – अमेरिकेतील टेक्‍सास प्रांतात गोळीबाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जण ठार झाले आहेत. त्यापैकी एक घटना कोर्प्स या उपनगरातील एका नर्सिंग होममध्ये घडली. रिटेमा मनोर नर्सिंग होममध्ये काल झालेल्या गोळीबारामध्ये तिघे जण मरण पावले. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे, असे रोब्स्टोन शहराचे सचिव हर्मन रॉड्रीग्ज यांनी ट्‌विटरवर सांगितले.

या गोळीबाराशी संबंधित एका घरामध्ये आणखी दोघेजण मृतावस्थेमध्ये आढळले होते. नर्सिंग होममध्ये मृतावस्थेत आढळलेल्यांमध्ये हल्लेखोराचाही समावेश होता. य दोन्ही घटनांमध्ये परस्पर संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या गोळीबारामागील नेमका हेतू समजू शकलेला नाही. तसेच हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्‍तींची ओळखही अद्याप पटवण्यात येऊ शकलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत संदिग्धता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)