टॅक्‍स वाचवताना…

आपल्या उत्पन्नावर सर्वांनाच कर वाचवायचा असतो. कर वाचण्यासाठी बरीच मंडळी घाईगडबडीत गुंतवणूक करत राहतात. यात अकारण पैसा अडकून राहतो आणि परतावाही समाधानकारकरीत्या मिळत नाही. यासाठी कर सल्लागार किंवा आर्थिक सल्लागाराची मदत घेणे फायद्याचे ठरते. मात्र कायदेशीरीत्या कर वाचवण्याचे काही सोपे मार्ग आहेत. यासंदर्भात काही सोप्या पद्धती सांगता येतील.

गृहकर्ज : आपल्यावरच्या आर्थिक जबाबदाऱ्या या कर सवलतीचा लाभ देण्यास मदत करू शकतात. ही जबाबदारी बहुतांश वेळी गृहकर्जाशी निगडित असते. कारण यापासून अनेकप्रकारच्या करसवलती गृहकर्जदारांला मिळू शकतात. जर आपण एखादे नवीन घर खरेदी करण्याची योजना करत असाल तर आपली गरज भागवण्यासाठी गृहकर्ज घेऊ शकतो. एखादे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी हप्ता भरणाबरोबरच अतिरिक्त रक्कम मुद्दल रक्कमेत भरत असाल तर त्या आधारावर कर सवलतीसाठी दावा करू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाड्याचे घर असेल तर : जर आपण भाड्याच्या घरात राहत असाल किंवा आपण आई-वडिलांच्या घरात राहताना त्यांना भाडे देत असाल तर आपल्याला हाऊस रेंट अलाउन्स (एचआरए)च्या कपातीचा दावा करू शकता.

दान करा : आपण प्राप्तीकर मान्यताप्राप्त संस्थेत आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान करू शकता. या संस्था स्वयंसेवी असू शकतात किंवा एखादा मदतनिधी देखील असू शकतो. जसे की गेल्यावर्षी केरळमधील निसर्गाच्या प्रकोपानंतर मोठा पूर आला. तेथील पीडितांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू केला. यासाठी मदतनिधी उभारण्यात आला. सरकार, स्वयंसेवी संस्था, विविध इलेक्‍ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांनी देखील सहायता निधीसाठी आवाहन केले होते. या निधीत आपणही मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडू शकतो आणि करसवलतीचा लाभ मिळू शकतो. पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी यास अर्थसाह्य केल्यास प्राप्तीकरात सवलत मिळते. एखाद्या मंदिराच्या किंवा ऐतिहासिक वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी केलेली मदत देखील करसवलत देण्यास पात्र ठरू शकते.

विमा उतरवा : आरोग्य विमा (हेल्थ इन्शूरन्स) करूनही प्राप्तीकरात सवलत मिळवता येते. हेल्थ इन्शूरन्ससाठी भरण्यात येणाऱ्या हप्त्याची रक्कम आपल्याला करसवलत देते. प्राप्तीकर कायदा कलम 80 डी नुसार करात 25 हजारांपर्यंत सवलत मिळवू शकतो.

उच्च परतावा देणारी गुंतवणूक ही नक्कीच आपला पोर्टफोलिओ मजबूत करते. मात्र एक संतुलित पोर्टफोलिओ आपल्या जोखमीची विभागणी करते. अशा पॉलिसीतून सुरक्षित परताव्याबरोबरच सुरक्षा देखील प्रदान होते. याशिवाय एका वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे हे आपल्या कराच्या दृष्टिकोनातून लाभदायक ठरू शकतो.

– मृणाल सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)