टीटीव्ही दिनकरन यांच्या घराच्या बाहेर गाडीने पेट घेतला

चेन्नई: अम्मा मक्कल मुनेत्रा कळघम पार्टीचे प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांच्या राहत्या घराच्या बाहेर गाडीने पेट घेतला.   त्यांचे समर्थक हा पेट्रोल बॉम्ब हल्ला होता असे म्हणत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातून काढलेले परीमलम हे पार्टी प्रमुखांच्या राहत्या घरी विरोध प्रकट करण्यासाठी आले होते. ते येताच त्यांच्या स्वत:च्या गाडीने पेट घेतला. हा हल्ला कोणी केला हे अज्ञात आहे. परंतु , हे परिमलम यांच्याकडून अनवधानाने झाले असावे असे पोलिसांना वाटते. त्यामुळे ते परीमलम यांच्या गाडी चालकाची चौकशी करत आहेत.
या प्रकारात दिनकरन यांच्या दोन समर्थकांना थोडी ईजा झाली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी असणार्या दिनकरन यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार परीमलम हे दिनकरन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याच्या इराद्याने आले होते पण पेट्रोल त्यांच्याच गाडीत पडल्याने आग लागली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)