टीका करायला अक्कल लागत नाही- खा. उदयनराजे भोसले

कोटेश्‍वर-अर्कशाळा पुलांच्या रुंदीकरणाचे भूमिपूजन

सातारा- टीका करायला फार अक्कल लागत नाही. पण विकास कामे पूर्ण करायला कर्तृत्व लागते. मी काय केले हे विचारणाऱ्यांनी स्वतः काय केले हे सांगावे. आजकाल टीका करणाऱ्यांनी चुन्याची होलसेल फॅक्‍टरी उघडली काय? लावला चुना केली टीका, अशी खरमरीत टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता केली.

मी सातारकरांचाच आहे. त्यांना मुलभूत सुविधा देण्याचा सातारा विकास आघाडीचा शब्द आहे. तो पूर्ण करणारच अशी स्पष्ट ग्वाही उदयनराजे यांनी दिली. करंजेतील भुयारी गटार योजनेच्या कामाचे भूमीपूजन तसेच शुक्रवार पेठ व शाहूपुरी यांना जोडणाऱ्या एक कोटी वीस लाख रुपये किंमत असणाऱ्या कोटेश्वर व अर्कशाळानगर पुलाच्या रुंदीकरणाच्या भूमिपूजनाचे नारळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत फुटले. करंजे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उदयनराजे यांनी विरोधकांचा खास शैलीत समाचार घेतला.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना कोपरखळ्याही लगावल्या. सातारा विकास आघाडीच्या जाहिरनाम्यात भुयारी गटार योजना अंर्तभूत आहे. त्याच योजनेचा नारळ फोडताना मला प्रचंड आनंद होत आहे. सातारकरांना अद्ययावत सुविधा देण्याचा माझा दिलेला शब्द मी पूर्ण करणारच. टीका करणाऱ्यांकडे मी अजिबात लक्ष देत नाही. कारण कामे करणे हे माझे उद्दिष्ट असते. सध्या “चूल माझी, तवा माझा भाणि भाकरी’ यांची अशी राजकीय शेरेबाजी मला ऐकावयास मिळते. ज्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, त्यांनी काहीच केले नाही. कारण टीका करायला फार डोके चालवावे लागत नाही.

मात्र, जाहिरनाम्यातील कामे पूर्ण करण्यासाठी कर्तृत्व लागते. आणि सातारकरांना दिलेला शब्द हळूहळू सत्यात उतरतो आहे, याचा मला आनंद आहे. कास धरण उंची, भुयारी गटार योजना, चोवीस तास पाणी, सोनगावला घनकचरा प्रकल्प प्रक्रिया या विकास कामांमुळे शहरात सुविधा निर्माण होत आहेत. ग्रेड सेपरेटरमुळे वाहतुकीची अडचण होत आहे, मात्र नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, गटनेत्या स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, मुख्याधिकारी शंकरराव गोरे अभियंता भाऊसाहेब पाटील यावेळी उपस्थित होते.

उदयनराजेंची मिश्‍किली
खासदार उदयनराजे आज भलतेच मिश्‍किलीच्या मूडमध्ये होते. विरोधकांची फिरकी तर घेतलीच शिवाय कार्यकर्त्यांना कानपिचक्‍यासुध्दा दिल्या. करंजे परिसरातील मला त्रास देणाऱ्या मित्रांनो कामाच्या वेळी त्रास देऊ नका जर त्रास दिला नाही तर मी तुमचाच आहे, असे उदयनराजेंनी म्हणताच सभामंडपात एकच हशा उसळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)