टाळ, मृदंगाच्या ठेक्‍यावर चिमुकल्यांनी धरला ठेका

चिंबळी- आषाढी एकादशीचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ स्कूल व कॉलेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली. यावेळी “माऊली माऊली, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा जयघोष करीत व अभंगांची गोडी अनुभवत टाळ, मृदंगाच्या ठेक्‍यावर चिमुकल्यांनी ताल धरला. तसेच वृक्षदिंडी, स्वच्छता मोहीम, मुली वाचवा आणि शिकवा यावर आधारित जनजागृती फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
लहान वयात मुलांना वारिची परंपरा माहित व्हावी या उद्देशाने आषाढी पायी वारी पालखी सोहळो व गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन पालखी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्राचार्य अनिता टिळेकर यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्‍यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे चिमुकल्यांची ही वारी आकर्षणाचा विषय ठरली. या वेळी हातात भगवे पताके व मुलींनी डोक्‍यावर तुळस घेतली व पारंपारिक वेशभूषेत उपस्थितीती लावली. शालेय विद्यार्थ्यांना भक्‍ती भावात दंगताना पाहून गावकऱ्यांनीही त्यांचा उत्साह वाढविला. त्यांनीही मुलांमध्ये येऊन हरी नामाचा गजर केला. दिंडीत मुलींनी डोक्‍यावर तुळशीची रोपे, कळशी घेऊन गावकऱ्यांना वृक्ष संवर्धनाचाही संदेश दिला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गवारे, कार्याध्यक्षा विद्या गवारे, उपसरपंच आशिष येळवंडे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)