टायगर श्रॉफचा मुंबईत “आशियाना’

मुंबईसारख्या शहरात आपला हक्काचा आशियाना मिळवण्यासाठी कलाविश्वातील सेलिब्रिटीही धडपड करत असतात. आणि त्यातही बरेच यामध्ये यशस्वीही होतात. गेल्या वर्षभरात या शहरात अभिनेता शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि अशा बऱ्याच कलाकारांनी नवी घरे घेतली. आता त्यात अभिनेता टायगर श्रॉफच्या नावाचाही समावेश झाला आहे.

टायगरने खार पश्‍चिम येथे “रुस्तमजी पॅरामाऊंट’मध्ये आठ बेडरुमचे घर खरेदी केल्याचे समजते. त्याने एकूण तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. हे फ्लॅट नवव्या मजल्यावर 1,500 चौरस फुट, एकवीसाव्या मजल्यावर 1900 आणि 2100 चौरस फुटांचे असल्याचे कळत आहे. त्याने या तीनही घरांसाठी तेवढी किंमतही मोजली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याने नवव्या मजल्यावरच्या फ्लॅटसाठी जवळपास 7.61 कोटी रुपये, एकविसाव्या मजल्यावरील दोन्ही फ्लॅटसाठी त्याला साधारण 22.33 कोटी रुपये मोजावे लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नव्या घरासाठी टायगरने या साऱ्या प्रक्रियेमध्ये स्टॅंप ड्युटी वगैरेची किंमत जोडली तर तब्बल 31.5 कोटी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)