टाकळी हाजी, निमगाव दुडेतील छावणीला वळसेंची भेट

टाकळी हाजी- टाकळी हाजी व निमगाव दुडे येथील चारा छावणीस भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी भेट देऊन छावणीची पाहणी केली.

टाकळी हाजी येथील छावणीमध्ये जनावरांची संख्या 893 आहे. निमगाव दुडे येथील छावणीमध्ये 750 दाखल झाली आहेत. दाखल केलेल्या जनावरांच्या मालकांची भेट घेवून विचारपूस केली. छावणीतील मिळणारा ओला चारा पशुखाद्य याबद्दल माहिती घेतली. वाढत्या उष्णतेने जनावरांना काही आजार होऊ नये म्हणून जनावरांची काळजी घेण्याची सूचना शेतकऱ्यांना व सबंधित छावणी कर्मचाऱ्यांना दिली. शिरुर तालुक्‍यात भीमाशंकर कारखान्यामार्फत पाबळ व टाकळी हाजी येथे तर पराग कारखान्यामार्फत निमगाव दुडे येथे छावणी सुरू केल्याने भागातील जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

शिरुर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील तसेच माजी आमदार पोपटराव गावडे यांचे आभार मानले. निमगाव दुडे व टाकळी हाजी येथील चारा छावण्यामध्ये 1 हजार 600 जनावरांची चारा व पाण्याची सोय झाल्याने शेतकऱ्यांना टंचाई काळात भीमाशंकर व पराग कारखान्याने सामाजिक बांधिलकीतून दिलासा मिळाला आहे. यावेळी टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे, पराग कारखान्याचे जनरल मॅनेजर विनायक नेमाडे, भीमाशंकरचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, पराग कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी अंकुश आढाव, सहायक ऊस विकास अधिकारी दिनकर आदक, शेतकरी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.