टाकळी भीमात शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन

तळेगाव ढमढेरे- शिरूर तालुक्‍यातील टाकळी भीमा येथील श्रीराम मंदिरामध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. अनेकदा पुरेशी माहिती न मिळाल्याने शेतकरी सुवेधेपासून वंचित राहत असल्यामुळे शेतकरी मेळावा घेण्यात आला. याचे आयोजन राहूल दोरगे यांनी केले होते.
महाबॅंक किसान कार्ड/पीक कर्ज आणि कृषी क्षेत्राच्या इतर योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी मेळावे घेतले जात असून विशेष प्राधान्य, तात्काळ नवीन पिक कर्ज/ नूतनीकरण, कर्जमाफीतील लाभार्थी शेतकरी, गृहकर्ज, चारचाकी वाहन कर्ज, ग्रीन पॉलीहाऊस, जमीन सुधारणा कर्ज, जमीन खरेदीसाठी कर्ज, पाईपलाईन आणि इतर कृषी योजनापासून शेतकरी वंचित राहत असल्यामुळे त्यांना वेळेला पैसे मिळण्यासाठी खासगी सावकाराकडे जावे लागते. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबतो. त्याची प्रगती खुंटते. अनेक शेतकऱ्यांना अशा बऱ्याच योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. यामध्ये लघू शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे पाच एकर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असते. अडीच एकर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असते, याची सखोल माहिती दिली.
यावेळी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी सुनिता देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तळेगाव ढमढेरे शाखा व्यवस्थापक रमेश रायकवार, उपशाखा व्यवस्थापक परवेश कुमार, कृषी अधिकारी संदीप केंद्रे, कर्मचारी राजेंद्र उनवणे, टाकळी भीमा पोलीस पाटील प्रकाश करपे, सरपंच रवींद्र दोरगे, उपसरपंच पांडुरंग ढोरे, माजी चेअरमन दशरथ वडघुले, माजी सैनिक विठ्ठल वडघुले, नवनाथ काळभोर, विशाल काळभोर, मोहन गायकवाड, संपत वडघुले, रामदास दोरगे, गोपीनाथ वडघुले, राजेंद्र कामठे, विक्रम वडघुले, बजरंग वडघुले, डॉ.दौलत घोलप आदी शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवव्याख्याते आकाश वडघुले यांनी केले. तर आभार नवनाथ काळभोर यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)