टाकळीभानचा महादेव यात्रोत्सव उत्साहात 

टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील महत्त्वाच्या टाकळीभान गावचे ग्रामदैवत महादेवाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. येथील कुस्ती अखाड्यात राज्यभरातील मल्लांनी हजेरी लावली.
सोमवारी शेकडो तरुण भाविकांनी आणलेल्या गंगाजलाने महादेवाला अभिषेक घालून यात्रोत्सवाला सुरुवात झाली. दिवसभर विविध मंडळांच्या झेंडा मिरवणुकीने परिसर दणाणून सोडला होता. सायंकाळी शोभेच्या दारुच्या आतषबाजीने भाविकांची मने जिंकली. रात्री हरिभाऊ बडेसह नंदा राणी नगरकर यांच्या लोकनाट्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. मंगळवारी सकाळी कलाकारांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम पार पडला. सर्व कलाकारांना त्यांच्या मागणीप्रमाणे यात्रा समितीकडून बिदागी देण्यात आली.
दुपारी चार वाजता सुरू झालेला कुस्त्यांचा फड रात्री आठ वाजेपर्यंत सुरुच होता. राज्यभरातील मल्लांनी हजेरी लावल्याने व एकापेक्षा एक सरस कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अंतिम कुस्ती बरोबरीत सुटल्याने प्रथम पाच हजाराचे पारितोषक विभागून देण्यात आले. तर रात्री सादर झालेल्या आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाने गर्दीचा गेल्या वर्षीचा उच्चांक मोडीत काढला.
गेल्या महिनाभरापासून यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा समितीचे सदस्य राजेंद्र कोकणे, चंद्रकांत लांडगे, गजानन कोकणे, गोरख कोकणे, अमोल पटारे, मधुकर गायकवाड, बाळासाहेब कोकणे, गोरख नवघने, विशाला पटारे, बंडूतात्या कोकणे, शिवाजी पटारे, सुनील बोडखे, दादासाहेब कोकणे, उमेश त्रिभुवन, राजू बोडखे, बंडोपंत बोडखे, आबासाहेब रणनवरे, राजेंद्र देवळालकर, बापू शिंदे, अशोक गांगुर्डे, सतीश रणनवरे, काकासाहेब डिके, अप्पासाहेब कापसे, बाळासाहेब दुधाळे, गोविंद पवार आदींनी परिश्रम घेतले. यात्रोत्सव काळात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)