टांझानियात किलिमांजारो शिखरावर यशस्वी चढाई

महाराष्ट्रातील पोलिसाने फडकवला भारताचा राष्ट्रध्वज

सातारा, दि. 30(प्रतिनिधी)- टांझानियातील किलिमांजारो शिखरावर चढाई करुन महाराष्ट्रातील पोलिसाने प्रजासत्ताक दिनाचे निमीत्त साधून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला.
मुळचे सातारा जिल्ह्यातील नांदवळ गावचे तुषार पवार यांनी ही कामगिरी केली.पवार नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक भगवा, तिरंगा व महाराष्ट्र पोलीस ध्वज फडकावून भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.विशेष म्हणजे जगातील चौथ्या क्रमांकाच्या शिखरावर भारताचा गणराज्य दिन साजरा करणारे पहिलेच महाराष्ट्र पोलीस आहेत. या मोहिमेत अकोलाचे धीरज कळसाईत, पिंपरी चिंचवडचे साई कवडे व पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांनी सहभाग घेतला होता. मोहिमेत खास बाब म्हणजे या मोहीमेचे नेतृत्व अनिल वाघ ,प्रियांका गाडे यांनी केले.विशेष म्हणजे तुषार पवार यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्दीमध्ये या शिखरावर चढाई केली. अशी चढाई करणारे ते पहिला भारतीय पोलीस ठरले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)