झेडपी पदाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर

हायमास्ट घोटाळ्याची पंचायत राज समितीकडे चौकशी मागणी करणार ः वाकचौरे

नगर – हायमास्ट दिव्यांच्या उभारणीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करीत सर्व नियम धाब्यावर बसून मोठ्या संख्येने हायमास्ट दिवे बसविले आहेत. हायमास्ट दिवे घेण्यास यापूर्वीच विरोध केला होता. पण विरोधाला न जुमानता जिल्ह्यात हायमास्ट बसविले आहे. त्यामुळे आता याबाबत पंचायत राज समितीकडे चौकशी मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी “प्रभात’ शी बोलतांना दिली.
जिल्हा परिषदेमध्ये नव्याने हायमास्ट घोटाळा उघडकीस असल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मार्जिन मोठ्या प्रमाणावर असल्याने जिल्हा परिषद स्वनिधीसह 13 वा वित्त आयोगाचा निधी देखील या हायमास्ट दिवे उभारणीसाठी वापरण्यात आला आहे. 13 वा वित्त आयोगाचा निधी विद्युत कामासाठी वापरता येत नाही. असे असेल तरी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. या निधीतून रस्त्यांची कामे करता येतात. पण विद्युत कामे करता येत नाही. असा स्पष्ट शासनाचा अध्यादेश आहे. परंतू सर्व नियम धाब्यात बसून पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून अधिकाऱ्यांनी हायमास्ट दिवे बसविले आहेत. 13 वा वित्त आयोगातून तब्बल 117 हायमास्ट उभारण्यात आले आहेत, असे सांगून वाकचौरे म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. राहाता व अकोले तालुक्‍यात मोठ्या संख्येने हायमास्ट दिवे बसविले असून राहाता तालुक्‍यात एका पदाधिकाऱ्याने आपल्या ऊसाच्या शेतामध्ये हे दिवे उभारले आहे. जिल्ह्यात 971 हायमास्ट दिवे उभारण्यात आले असून त्यामाध्यमातून किती प्रकाश पडला हे देखील तपासण्याची गरज आहे.
कोठे हायमास्ट उभारले, ते ठिकाणी योग्य आहे की नाही. हे तपासण्याची आवश्‍यक आहे. आज गरज नसलेल्या ठिकाणी व पदाधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे हायमास्ट दिवे उभारण्यात आले आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. बाजारभावापेक्षा जास्त किमत लावून निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतू त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हायमास्ट घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी पंचायत राज समितीकडे लवकरच पत्रव्यवहार करणार आहे. असे सांगून वाकचौरे म्हणाले, पुढील महिन्यात जिल्ह्यात पंचायत राज समिती येणार आहे. त्यापूर्वी या घोटाळ्याची सविस्तर माहिती समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांकडे पाठविणार आहे.
हायमास्ट घोटाळ्याचे मोठे रॅकेट आहे. ही साखळी असून त्यात मोठे मासे देखील अडकले आहेत. मर्जीतील सदस्यांच्या गटात मोठ्या संख्येने हायमास्ट दिवे उभारण्यात आले आहेत. त्यात आर्थिक गैरव्यवहार देखील मोठा असून जिल्हा परिषदेने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीगोंदा गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हायमास्ट दिव्यांच्या उभारणी प्रकरणी श्रीगोंदा गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. असे असतांनाही हायमास्ट दिवे उभारतांना सर्व नियम व अटी धाब्यावर बसविण्यात आले. त्यामुळे यामागे मोठा गॉडफादर असल्याची शक्‍यता असल्याचा आरोप वाकचौरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)