झेडपीची सातारा बिल्डर असोशिएनला नोटीस

File pic

सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या मैदानावर रचना-2019 प्रदर्शन आयोजित केले होते. परंतु सातारा बिल्डर असोशिएनने ठरवून दिलेल्या दिवसांपेक्षा जादा दिवस म्हणजे वीस दिवस या मैदानाचा वापर केल्याची बाब समोर आली आहे. जादा दिवस वापरलेल्या मैदानाचे भाडे रक्कम भरावी. अन्यथा आपल्या अनामत रकमेतून ती वसुल केली जाईल, अशी नोटीस सातारा बिल्डर असोशिएनला जिल्हा परिषदेच्या बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी बजावली आहे.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर फिरण्यासाठी येणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातारा बिल्डर असोशिएनने परवानगी पेक्षा जादा दिवस मैदानाचा वापर करून जिल्हा परिषदेचे नुकसान केले आहे. जादा दिवसांचे भाडे बिल्डर असोशिएनशने भरले नाही अशी तक्रार केली होती. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत लक्ष घालून बांधकाम विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांना चौकशी करून कारवाईचे सुचना केल्या. त्यानंतर 23 जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता पाटील यांनी माहिती घेतली. बिल्डर असोशिएशनने झेडपीचे मैदान रचना-2019 या प्रदर्शनासाठी भाडे तत्वावर मिळावे यासाठी 13 डिसेंबर रोजी अर्ज केला होता. त्यानंतर 28 जानेवारी पासून हे मैदान वापरण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु बिल्डर असोशिएशनने 20 जानेवारीपासून या मैदानाचा ताबा घेवून काम सुरू केले होते, ही बाब समोर आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)