झिनेदिन झिदान यांनी सोडले रिअल माद्रिदचे प्रशिक्षकपद 

पॅरिस – रियल माद्रिद संघाने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावून जेमतेम पाच दिवसही झाले असताना त्यांचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्‍लबला सोडचिठ्ठी दिली आहे. झिदान यांनी रिअल माद्रिदला तीन वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून दिले होते. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणे गरजेचे असते. रिअल माद्रिद क्‍लब विजेतेपदासाठी पात्र होता आणि त्यांना भविष्यात ही परंपरा कायम राखायची असेल, तर बदल घडविणे आवश्‍यक आहे. मी विजेता प्रशिक्षक असलो, तरी मला पराभव आवडत नाही. त्यामुळेच मी रिअल माद्रिद क्‍लबला सोडचिठ्ठी देत आहे, असे झिदान यांनी सांगितले.

राफाएल बेनिटेझ यांच्यानंतर झिदान यांनी रिअल माद्रिदचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यानंतर क्‍लबने आतापर्यंत झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली 149 सामने खेळताना त्यातील 104 सामन्यांत विजय मिळवला, तर 29 सामन्यांमध्ये त्यांनी बरोबरी साधली. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलवर 3-1 अशी मात करताना रिअल माद्रिदने चॅम्पियन्स करंडक जिंकला. तसेच झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने 9 जेतेपदे पटकावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झिदान यांनी सांगितले की, रिअल माद्रिद या क्‍लबवर माझे अपार प्रेम आहे. संघामध्ये अजूनही विजयाची भूक कायम आहे. पण मला थोडा बदल हवा म्हणून मी क्‍लब सोडत आहे. त्यांचा रिअल माद्रिदशी 2020 पर्यंत करार असून दोन वर्षे बाकी असतानाच त्यांनी राजीनामा दिला आहे. यावेळी हजर असलेले रिअल माद्रिद संघाचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ म्हणाले की, झिदान यांचा प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. मात्र रोनाल्डोच्या क्‍लब सोडण्याच्या निर्णयाशी त्याचा काहीही संबंध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)