झाडांना खिळे मारणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

निगडी – गेल्या अकरा आठवड्यांपासून खिळेमुक्त झाडे हे अभियानात प्राधिकरणात राबवले जात आहे. जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेले कित्येक दिवसांपासून होत आहे. खिळेमुक्‍त अभियानास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही समर्थन दिले. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

आज अ प्रभागाचे अधिकारी एम.एम. शिंदे आणि बापूसाहेब गायकवाड यांनी झाडांवर खिळे आणि बॅनर लावल्याबद्दल तीन दुकानदारांवर कारवाई करत दंड आकारण्यात आला. अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे आणि शिंदे यांनी ह्या वेळी बोलताना सांगितले कि अ प्रभागात कुठेही झाडांवर जाहिरात किंवा बॅनरसाठी कोणी खिळे ठोकताना आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सुद्धा झाडांवर असलेल्या जाहिरातींचे फोटो काढून अ प्रभागामध्ये द्यावे.
एकीकडे सामाजिक संस्था खिळे काढत होती तर प्रशासनाकडून दुसरीकडे दंड आकारण्यात येत होता. काही दुकानदारांना आणि नागरिकांना समज देण्यात येत होती. प्राधिकरणातील रहिवासी अशा ह्या मोहिमेमुळे आश्‍चर्य व्यक्त करत होते, पण प्रशासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या कामगिरीमुळे खुश होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांनी राबवलेल्या खिळेमुक्‍त झाडे या उपक्रमाअंतर्गत सर्व झाडांना प्रथम खिळेमुक्‍त करून त्यानंतर त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी त्यांच्या भोवती आळे करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आज अ प्रभाग कार्यालय लगत अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे आणि नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या हस्ते आळे करण्यात आले आणि दोन्हीही नगरसेविका खिळेमुक्‍त झाडांसाठी सातत्याने सहभाग घेत आहेत. यावेळी सूर्यकांत मुथियान, राजेंद्र बाबर, दत्तात्रय जोशी, संदीप रांगोळे, रोहित शेणॉय, प्राजक्ता रुद्रावर, केतकी, पानसे, कारेकर, सचिन काळभोर, राहुल धनवे, अन्वर मुलाणी ह्या उपक्रमात सहभागी झाले होते.
निगडी प्राधिकरण : झाडांमधील खिळे काढताना सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)