ज्वारीला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ 

कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा : कृषी विद्यापीठात ज्वारी सुधार प्रकल्पाची आढावा बैठक
राहुरी विद्यापीठ – जगामधील महत्त्वाच्या पिकांमध्ये ज्वारी हे पीक पाचव्या क्रमांकाचे आहे. ज्वारीमुळे धान्य उत्पादनाबरोबर चारा उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळते. ज्वारीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते आरोग्यवर्धक पीक असून त्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. केंद्र शासनाचा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेच्या दृष्टीने ज्वारी पिकाच्या मुल्यवर्धनाला महत्त्व आहे. पीक विविधतेच्या दृष्टीनेदेखील ज्वारी पीकाला महत्त्व आहे. आरोग्य आणि अन्नसुरक्षेच्या अनुषंगाने ज्वारी हे महत्वाचे पीक आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले.
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय समन्वीत ज्वारी सुधार प्रकल्पाची 48 व्या वार्षिक आढावा बैठकीच्या समारोपप्रसंगी कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (चारा पीके) डॉ. आय. एस. सोळंकी, भाकृअप, मिलेटस्‌ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विलास टोनापी, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता (पम) डॉ. जे. व्ही. पाटील, वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. अशोक जाधव उपस्थित होते.
डॉ. आय. एस. सोळंकी म्हणाले, खरीप ज्वारीचे उत्पादन रब्बी ज्वारीपेक्षा अधिक असले तरी खरीप ज्वारीच्या कणसांवर बुरशी हा रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. या रोगाला प्रतीकारक्षम वाण विकसीत करणे हे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान आहे. संचालक डॉ. विलास टोनापी यांनी तीन दिवस झालेल्या बैठकीमधील संशोधनाचा अहवाल मान्यवरांसमोर मांडला. यावेळी ज्वारीचे सात वाणांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्यात आली.
या तीन दिवसीय बैठकीत देशातील विविध संशोधन केंद्रात ज्वारीवरील गतवर्षात झालेले संशोधनाचे सादरीकरण झाले आणि या वर्षात ज्वारी पिकाची संशोधनाची दिशा ठरविण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी ज्वारी संशोधनातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. आर. बापट, डॉ. एस. डी. उगले, डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. एस. आर. गडाख, डॉ. डी. बी. पवार, डॉ. यु. डी. चव्हाण, डॉ. ए. एस. जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. विलास टोनापी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)