“ज्ञानेश्‍वर’च्या अध्यक्षपदी यतीनकुमार हुले

मंचर- मंचर (ता. आंबेगाव) येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभियंता यतीनकुमार हुले आणि उपाध्यक्षपदी जगदिश घिसे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी संचालकांसह संस्थेचे सभासद उपस्थित होते. आंबेगाव तालुक्‍याचे सहाय्यक निबंधक पी. एस. रोकडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले आणि समता नागरिक ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष विठ्ठल महामुनी उपस्थित होते. यानंतर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते करण्यात आला. सहनिबंधक पी. एस. रोकडे यांचा सत्कार नवनिर्वाचित अध्यक्ष यतिनकुमार हुले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेने बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचा वारसा जोपासलेला आहे. त्यांनी सर्व संचालक आणि सभासदांचे कौतुक केले, तसेच त्यांच्या हस्ते संस्थेचे नवनिर्वाचित संचालक अशोक करंडे, नवनाथ बाणखेले, अशोक गांजाळे,सतीश बाणखेले, संतोष भालेराव, कैलास बांगर, दिनकर सैद, मधुकर गायकवाड, बबन सोनवणे, अनिल लबडे,संचालिका वत्सला जाधव, ललीता काळे यांचा आणि संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. एम. डोके यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)