ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छ भारत अभियानाची शपथ

निगडी – रूपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयामध्ये स्वच्छ भारत जनजागरण उपक्रम फेरी अभियानांतर्गत स्वस्छ भारत जनजागरण फेरी, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बुधवारी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी “स्वच्छतेची शपथ’ घेतली. महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील भारत देशाची प्रतिमा ही फक्‍त राजकीय दृष्टीने स्वतंत्र देश नसून स्वच्छ आणि विकसित देश अशी होती. गुलामगिरीची सर्व बंधने तोडून त्यांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. अस्वच्छतेचा नायनाट करून भारत मातेची सेवा करणे हे आता आमचे काम आहे, असे विचार यावेळी प्राचार्य सूर्यकांत भसे यांनी व्यक्‍त केले. या दृष्टीने सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली आहे. स्वच्छतेसाठी जागृत राहून दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यात दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संस्काराचा अंगिकार करेन. मी अस्वच्छता निर्माण करणार नाही आणि करू देणार नाही. सर्व प्रथम मु स्वत:पासून कुटूंब, परिवार, माझे गाव, कार्यशाळेपासून सुरू करेन. देश स्वच्छ दिसतो त्यामागेत्या देशातील नागरिक अस्वच्छता पसरवत नाहीत.,होऊ देत नाहीत.याच विचारधारेवरमी प्रत्येक गाव, परिसर स्वच्छ भारत मोहिमेचा प्रचार करेन, अशी शंभर जणाकडून प्रतिज्ञा म्हणून घेईन अशी शपथ घेतली. यावेळी प्राचार्य सूर्यकांत भसे, हेमलता सरोदे, दयानंद सोनकांबळे, सुबोध गलांडे उपस्थित होते. काकासाहेब कैचे, चांगदेव तोरणे, पल्लवी शिंगाडे, उज्वला जाधव, स्मिता मुळे यांनी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)